बेळगाव,
निवडणुकीनिमित्त ठिकठिकाणी उभारलेले चेक पोस्ट तालुक्यात सर्वसामान्य नागरिकांसाठी डोकेदुखी बनत चालले आहेत. येळ्ळूर येथील चेक पोस्टवर त्या ठिकाणी तैनात केलेल्या पोलिसांकडून २ एप्रिल रोजी झालेल्या पोलिस ध्वज दिनाच्या स्टिकरचे वाहन चालकांना बळजबरीने वितरण केले जात आहे. त्या मोबदल्यात वाहन सरकारकडून शंभर ते पाचशे रुपयापर्यंत पैसे वसूल केले जात असल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
निवडणुकीनिमित्त पैसे तसेच मद्याची होणारी बेकायदेशीर तस्करी रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे तालुक्यात विविध ठिकाणी चेक पोस्ट उभारले आहेत. मात्र, त्या ठिकाणी नियुक्त करण्यात आलेल्या पोलिसांकडून वाहन चालताना विनाकारण त्रास देण्याचे प्रकार घडत असल्याचे सातत्याने दिसून येत आहे.
वाहनचालकांना अशा प्रकारच्या पोलिस ध्वज दिनाच्या स्टिकरचे वितरण केले जात आहे. स्टिकर दुचाकी वाहन चालकांची अडवणूक करून कागदपत्रांची विचारपूस करण्यासह विनाहेल्मेट फिरणाऱ्याकडून दंड वसूल करणे. त्याचबरोबर २ एप्रिल रोजी झालेल्या पोलिस ध्वजदिनाची बळजबरीने वाहन चालताना देण्यात येत आहेत.
त्या मोबदल्यात शंभर रुपयांपासून ते पाचशेपर्यंत आकारले जात आहेत. याकडे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी केली जात आहे.