खानापूर समितीकडे आबासाहेब दळवींचा अर्ज दाखल
खानापूर :
विधानसभा निवडणुकीसाठी खानापूर मतदारसंघात निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असणारे आबासाहेब दळवी यांनी आज खानापूर विभाग समिती निवड समितीकडे आपला विनंती अर्ज सादर केला आहे.यावेळी शिवाजी पाटील (मणतुर्गे), अरुण देसाई (नेरसे),ईश्वर बोबाटे (मणतुर्गे), बाळासाहेब शेलार (मणतुर्गे),राजाराम देसाई (हलशीवाडी), खानापूर समितीचे अध्यक्ष गोपाळराव देसाई, कार्याध्यक्ष यशवंत बिर्जे, चिटणीस सीताराम बेडरे, खजिनदार संजय पाटील, परशराम कदम हलशी, प्रसादसिंह दळवी (खानापूर) आदी उपस्थित होते.