काँग्रेसकडून उमेदवारांची दुसरी यादी जाहीर

बेळगाव : प्रतिनिधी

उमेदवारी जाहीर करण्यात आघाडीवर असलेल्या काँग्रेसने आणखी 70 उमेदवारांची नावे बुधवारी बंगळुरू येथे झालेल्या बैठकीत निश्‍चित केली. उर्वरित 30 उमेदवार निश्‍चित होणे बाकी आहे. एकूण 224 उमेदवारांच्या यादीतील पहिली 124 उमेदवारांची यादी 25 मार्च रोजीच काँग्रेसने जाहीर केली आहे. उर्वरित 100 उमेदवारांची दुसरी यादी 9 एप्रिलनंतर जाहीर होण्याची शक्यता असून,

काही  उमेदवारांनी आपल्यालाच उमेदवारी मिळावी, यासाठी दबाव आणला आहे. बंगळुरू येथे काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेस नेते राहुल गांधी. ए. के. अँटोनी, अंबिका सोनी, डॉ. गिरीश व्यास यांच्यासह काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार, विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या, बी. के. हरिप्रसाद, प्रचार समितीचे अध्यक्ष एम. बी. पाटील, माजी उपमुख्यमंत्री डॉ. जी. परमेश्‍वर यांच्यासह काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत काल पार पडलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Previous post कोगनोळी चेकपोस्टवर १.५ कोटी रू. जप्त
Next post खानापूर समितीकडे आबासाहेब दळवींचा अर्ज दाखल