बेळगाव : प्रतिनिधी
कर्नाटक विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून, राष्ट्रीय पक्षांनी या निवडणुकीत अधिकाधिक जागांवर यश मिळविण्यासाठी कस लावला आहे. भाजपने नेहमीप्रमाणे स्टार प्रचारकांची यादी तयार केली असून, या यादीत विविध राष्ट्रीय नेत्यांसह महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेही नाव असल्याचे सुत्राने सांगितले.
एएनआयच्या अहवालात कर्नाटक विधानसभा निवडणुकीसंदर्भात भाजप प्रचारकांच्या नावांचा उल्लेख आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांच्यासह केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, स्मृती इराणी, निर्मला सीतारामन यांचीही नावे आहेत.