आर. एम. चौगुले यांनी समितीकडे उमेदवारी अर्ज दाखल केले.
बेळगाव : बेळगाव ग्रामीण मतदारसंघासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीकडे इच्छुक म्हणून मन्नुर येथील आर.एम. चौगुले यांनी आज अर्ज केला आहे. बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे चिटणीस ऍड. एम. जी.पाटील, माजी आमदार मनोहर किणेकर, युवा आघाडीचे चिटणीस मनोहर संताजी यांनी अर्जाचा स्वीकार केला आहे.
बुधवार दिनांक पाच रोजी अर्ज करण्यात आला आहे. यावेळी बी. एस. पाटील, माजी तालुका पंचायत सदस्य सुरेश राजूकर, दीपक पावशे, संजय पाटील, अनंत तुडवेकर, कांतेश चलवेटकर, नारायण कालकुंद्री, अनेक म.ए. समितीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.