आ.अभय पाटील यांच्या निवडणुक प्रचार कार्यालयात लक्ष्मी पूजन उत्साहात.
बेळगाव
बेळगाव दक्षिण मतदारसंघातील भाजपचे विद्यमान आमदार अभय पाटील यांनी विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली आहे.
त्यांनी आज सकाळी त्यांच्या फोर्ट रोड येथील कार्यालयात लक्ष्मी देवीची पूजा केली एवढेच नाही तर प्रचारासाठी वापरण्यात येणाऱ्या जीपचेही पूजन केले.
यावेळी आमदारांचे बंधू व दक्षिण मतदारसंघातील भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.