बेळगाव
जैन धर्मियांचे 24 वे तीर्थंकर श्री भगवान महावीर यांच्या जन्म कल्याणक महोत्सवाचा सोहळा शहरात साजरा झाला . यानिमित्त शहरातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली होती . यामध्ये हजारो धर्म बांधव सहभागी झाले होते. मान्यवरांच्या उपस्थितीत भगवान महावीर यांचे पूजन करून या जन्मोत्सव शोभायात्रेला प्रारंभ झाला.
मध्यवर्ती महावीर जन्म कल्याणक मंडळाच्या वतीने मंगळवारी शहरात महावीर भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सव साजरा करण्यात आला .यानिमित्त निघालेली शोभायात्रा लक्षवेधी ठरली होती यामध्ये आकर्षक चित्ररथ यांच्यासह टिपरी पथक आणि नृत्य पथकांचा समावेश होता . त्यामुळे या यात्रेला विशेष स्वरूप प्राप्त झाले होते. संयुक्त महाराष्ट्र चौक येथील श्री हनुमान मंदिरापासून या शोभायात्रेला प्रारंभ झाला . या शोभायात्रेमध्ये बालगोपाळ आणि युवा वर्गाचा सहभाग लक्षणीय होता. तसेच महिलांचे पथक देखील सहभागी झाले होते भगवान महावीरांनी दिलेल्या संदेशाची शिकवण प्रसारित करण्यासाठी या यात्रेचे चित्ररथ सजविण्यात आले होते.