डॉ. गौतम बगादी यांनी प्रादेशिक आयुक्त म्हणून सूत्रे स्वीकारली
बेळगाव :
नूतन प्रादेशिक आयुक्त डॉ.गौतम बगादी यांनी सोमवारी सायंकाळी आपल्या पदाची सूत्रे स्वीकारली येथील सहायक प्रादेशिक आयुक्त नजमा पिरजादे यांनी त्यांचे स्वागत केले. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक जिल्ह्यातील म्हणून नुकतीच एम. जी. हिरेमठ यांची बदली झाली. त्यांच्या जागी गौतम बगादी यांची नियुक्ती झाली आहे. बगादी यांनी यापूर्वी बेळगाव जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम केले आहे.आता निवडणूक काळात त्यांना सात जिल्ह्यांतील हालचालींवर नजर ठेवावी लागणार आहे.