मुख्यमंत्री बोम्मई दोन मतदारसंघातून लढणार?

बंगळूर:

मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्यासाठी आपल्या रणनीतीत भाजप काही बदल करण्याचा विचार करत आहे. त्यानुसार बोम्मई दोन मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची शक्यता आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री बोम्मई यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे त्यांचा शिग्गावी मतदारसंघात पराभव होण्याची शक्यता असल्याचे अनेक सर्वेक्षणात दिसून आले आहे.

शिग्गावीमध्ये पंचमसाली आणि मुस्लिम मते निर्णायक असल्याने गेल्यावेळेपेक्षा बोम्मईना यंदा विजयासाठी अधिक मेहनत करावी लागणार असल्याचे राजकीय निरीक्षकांना वाटते. पंचमसाली समाजाचे आणखी एक नेते माजी मंत्री विनय कुलकर्णी यांना बोम्मईंविरुद्ध रिंगणात उतरवण्याची तयारी आहे. पक्षाच्या सूत्रांनी सांगितले की जेडीएसचा उमेदवार जाहीर करण्यापूर्वी शेवटच्या क्षणापर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे. मुस्लिम मतांचे विभाजन करायचे असल्यास निजदन मुस्लिम उमेदवार उभा करावा, तरच बोम्मईचा विजय सुकर होईल, असे भाजपला वाटते.

शिवाय माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा, निजदचे अध्यक्ष एच. डी.कुमारस्वामी, प्रदेशाध्यक्ष सी.एम. इब्राहिम यांचाही बोम्मईंबाबत सकारात्मक दृष्टिकोन आहे. त्यामुळे भाजप पेक्षा काँग्रेसच्या निजदने उमेदवाराचा पराभव करण्याचा निर्धार केल्यास ते सक्षम उमेदवार उभे करू शकतात. निजदनेही पंचमसाली उमेदवार उभा केला, तर बोम्मईनी मतदारसंघ बदलणे अपरिहार्य ठरेल.

२०१८ च्या निवडणुकीत ७००० हून अधिक मते मिळविणारे यासिर खान पठाण आणि सोमण्णा बेवीनमराद हे निजदच्या तिकिटासाठी इच्छुक आहेत. त्यांच्यापैकी एका तिकीट मिळाले तरच बोम्मईंचा मार्ग सुकर होईल. बोम्मईंसाठी दोन मतदारसंघ शोधले जात आहेत, ते यासाठीच.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Previous post भगवान महावीरांची जयंती बेळगावात उत्साहात साजरी
Next post  डॉ. गौतम बगादी यांनी प्रादेशिक आयुक्त म्हणून सूत्रे स्वीकारली