रवीवारी (२ एप्रिल)तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक .
बेळगाव
बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक रविवार दिनांक २ एप्रिल रोजी दुपारी १.०० वाजता मराठा मंदिर (रेल्वे ओव्हर ब्रिज गोवावेस) येथे आयोजित करण्यात आली आहे. तरी या बैठकीत येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसंदर्भात कार्यकर्त्यांशी विचार व्यक्त करण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली आहे.
तरी या बैठकीला बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी, आजी-माजी लोकप्रतिनिधींनी,युवा आघाडीच्या कार्यकर्त्यांनी, महिला आघाडीचे कार्यकर्त्यांनी, वेळेवर उपस्थित रहावे, असे आवाहन बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे चिटणीस ऍड. एम. जी. पाटील यांनी केले आहे.