कर्जबाजारीपणाला कंटाळून एकाच कुटुंबातील चार जणांनी आत्महत्या केल्याचा संशय
बंगळूर : मंगळुरू येथील एका लॉजमध्ये शुक्रवारी सकाळी एकाच कुटुंबातील चार जणांनी आत्महत्या केली.म्हैसूरमधील विजयनगर येथील देवेंद्र (वय ४६), त्यांची पत्नी आणि अनुक्रमे १४ आणि १० वर्षांच्या दोन मुलींचा आत्महत्या केलेल्यांमध्ये समावेश आहे.देवेंद्रने कथितरित्या मंगळुरमधील के. एस. राव रोडवरील करुणा रेसिडेन्सी येथील लॉज रूममध्ये गळफास लावून घेतला.
कुटुंबाने तीन दिवसांपूर्वी हॉटेलचे बुकिंग केले होते.सुरुवातीला त्यांनी एक दिवस मुक्काम करण्याचे ठरवले होते, परंतु नंतर मुक्काम आणखी दोन दिवस वाढवला.मंगळूर शहराचे पोलिस आयुक्त कुलदीप कुमार आर जैन यांनी सांगितले की, देवेंद्रचा मृत्यू आत्महत्येने झाला, परंतु त्यांची पत्नी आणि मुलांचा मृत्यू कसा झाला हे अद्याप समजू शकलेले नाही.
सुसाईड नोटमध्ये देवेंद्रने आपल्याला आर्थिक समस्या असून कर्ज घेतल्याचे म्हटले आहे. याप्रकरणी शहर पोलीस अधिक तपास करत आहेत.