आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी मंत्री शशिकला जोल्लें यांच्या विरोधात गुन्हा दाखल
बेळगाव:
आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी धर्मादाय खात्याच्या मंत्री शशिकला जोल्ले यांच्यावर निपाणी शहर पोलिसांनी गुरुवारी गुन्हा दाखल केला. याबाबत अधिक माहिती अशी, दि.२९ रोजी शहर पोलिस स्थानकासमोरील म्युनिसिपल हायस्कूलच्या मैदानावर सायंकाळी रणरागिणी महिला मंडळाच्यावतीने आयोजित होम मिनिस्टर कार्यक्रमादरम्यान उपस्थित महिलांना जेवण दिल्याप्रकरणी व कार्यक्रमादरम्यान पक्षाचे गाणे लावल्या बाबतची तक्रार निवडणूक विभागाच्या (एफएसटी) पथकाकडेकरण्यात आली होती.
त्यानुसार पथकाने घटनास्थळी जाऊन पाहणी केली. मंत्री शशिकला जोल्ले आणि रणरागिणी अध्यक्षांवर महिला मंडळाच्या पोलिसांनी गुन्हा नोंद केला.