विधानसभेत पॉर्न बघत होता भाजप आमदार; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

विधानसभेत पॉर्न बघत होता भाजप आमदार; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

नवी दिल्ली : त्रिपुरामध्ये विधानसभेच्या निवडणूका जिंकत भाजपने सत्ता पुन्हा काबीज केली आहे. सलग दुसऱ्यांदा सत्तेत आलेल्या भाजपच्या एका आमदाराचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये भाजप आमदार विधानसभेच्या अधिवेशन सत्रादरम्यान सभागृहात बसून मोबाईलवर पॉर्न पाहाताना दिसत आहेत.

हा व्हिडीओ त्रिपुरा विधानसभेतील आज (३० मार्च) चाच असल्याचे सांगितले जात आहे. व्हिडीओमध्ये त्रिपुरा बागबासा विधानसभा मतदारसंघातील भाजप आमदार जादब लाल नाथ दिसत आहेत. ते सभागृहातील त्यांच्या सीटवर बसून मोबाईलवरती व्हिडीओ पाहाताना दिसत आहेत.

दरम्यान हे आमदार मोबाईलवर व्हिडीओ पाहताना कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. यानंतर आता जादब लाल नाथ यांच्यावर विधानसभेच्या कामकाजादरम्यान सभागृहात पॉर्न व्हिडीओ पाहिल्याचा आरोप केला जात आहे. दरम्यान हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे.

आज तकने याबद्दलचे वृत्त दिलं आहे. तसेच फॅक्ट चेकर मोहम्मद जुबैर यांनी देखील हा व्हिडीओ ट्वीट केला आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Previous post विद्यार्थिनीला अश्लील मेसेज पाठवीत आसलेल्या प्रिन्सिपलला अटक 
Next post फिलिपाइन्समध्ये २५० जणांनी भरलेल्या बोटीला आग, ३१ जणांचा मृत्यू, ७ बेपत्ता