‘नवहिंद सोसायटी’च्या चेअरमनपदी प्रकाश अष्टेकर तर व्हा. चेअरमनपदी अनिल हुंदरे
येळ्ळूर :
कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोवा राज्यात उल्लेखनीय कार्य करत असलेल्या नवहिंद को-ऑप.क्रेडिट सोसायटीच्या चेअरमनपदी श्री. प्रकाश पांडुरंग अष्टेकर यांची तर व्हा. चेअरमनपदी श्री. अनिल हणमंत हुंदरे यांची निवड करण्यात आली. सदर निवड 1 एप्रिल 2023 ते 30 नोव्हेंबर 2025 या अडीच वर्षांसाठी असणार आहे. 1 एप्रिल 2023 ते 31 मार्च 2028 या पांच वर्षांसाठी पुढील संचालक मंडळ कार्यरत राहणार आहे.
चेअरमन- प्रकाश अष्टेकर, व्हा. चेअरमन अनिल हुंदरे,संचालकः प्रदीप मुरकुटे, सी. बी. पाटील, उदय जाधव,शिवाजी सायनेकर, संभाजी कणबरकर, श्रीधर धामणेकर,श्रीमती एस. वाय. चौगुले, सौ. निता नारायण जाधव आणि भिमराव रा. पुण्याण्णावर.सदर निवडीप्रसंगी दशरथ पाटील, नारायण जाधव, आनंद मजकुर, वाय. सी. गोरल, नारायण गोरे, आनंद पाटील, पी. ए. पाटील, नारायण बस्तवाडकर, पंकज जाधव, प्रमोद जाधव इत्यादी उपस्थित होते.