एस.एस.एल.सी विद्यार्थ्यांना आनंदाची बातमी
बंगळुरू :
एसएसएलसी बोर्डाचे संचालक रामचंद्र यांनी सांगितले की, 31 तारखेपासून एसएसएलसी परीक्षा सुरू होणार असून परीक्षेची तयारी पूर्ण झाली आहे.याशिवाय यावेळी लेखी परीक्षा होत आहे बोर्डाने विद्यार्थ्यांना आनंदाची बातमी दिली आहे.
कोरोना बॅच मानून 10% ग्रेस मार्क्स देणार असल्याचे बोर्डाने सांगितले आहे. बोर्डाने फक्त तीन विषयांसाठी ग्रेस मार्क्स देण्याचा प्रस्ताव ठेवला आहे.फक्त भाषा आणि मुख्य विषयांना ग्रेस गुण दिले जातील.
कमी उत्तीर्ण गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांनाच हे लागू होईल, असे संचालकांनी सांगितले.मागील दोन वर्षांपासून कोरोनामुळे 10% सवलतीचे गुण दिले जात होते, ते यावर्षीही सुरू ठेवण्यात आले आहे.
8वी आणि 9वीचे विद्यार्थी गेल्या दोन वर्षात परीक्षा न देता उत्तीर्ण झाल्याने यावर्षीही 10% ग्रेस गुण देण्याचा निर्णय बोर्डाने घेतला आहे.
बेळगाव व चिकोडी शैक्षणिक जिल्ह्यात यंदा 78 हजार 780 विद्यार्थी दहावीची परीक्षा देणार आहेत. शुक्रवार, दि. 31 मार्चपासून परीक्षेला प्रारंभ होणार आहे. बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यात 33 हजार 190 परीक्षार्थी आहेत. 15 एप्रिलपर्यंत दहावीची परीक्षा चालणार आहे. बेळगाव जिल्ह्यात 120 तर चिकोडी शैक्षणिक जिल्ह्यात 151 केंद्रांवर दहावीची परीक्षा होणार आहे. या केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नजर असणार आहे. बेळगाव शहरात 8 हजार 623, बेळगाव ग्रामीणमधून 5 हजार 735, खानापूर तालुक्यातून 3 हजार 758 विद्यार्थी दहावीची परीक्षा देणार आहेत.