आचासंहिता भंग करण्यारवर कठोर कारवाई करा : जिल्हाधिकारी नितेश पाटील
बेळगाव :
कर्नाटक विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर झाल्याच्या पार्श्वभूमीवर आज बुधवारी (29 मार्च) जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दालनात झालेल्या निवडणूक अधिकारी व नोडल अधिकाऱ्यांच्या बैठक झाली. यावेळी नितेश पाटील म्हणाले, मतदान केंद्रांवर पायाभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. संबंधित मतदान केंद्राच्या सेक्टर अधिकाऱ्यांनी खात्री करावी असे निर्देशन दिले. आचारसंहितेचा भंग झाल्याचे आढळल्यास तत्काळ कायदेशीर कारवाई करावी, असा सूचना त्यांनी दिल्या.
सार्वजनिक ठिकाणावरील सर्व पोस्टर्स, बॅनर, भित्तिचित्रे काढून टाकण्यात यावीत. निवडणूक कामासाठी नेमलेल्या सर्व पथकांनी तातडीने कामाला लागावे, असा इशारा जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी दिला.