बेळगावी तालुक्यातील बाची चेकपोस्टवर २७.३४ लाख रु.जप्त.
बेळगावी तालुक्यातील बाची चेकपोस्टवर २७.३४ लाख रु.जप्त.
बेळगाव : बसमधून नेण्यात येणारी २७.३४ लाखांची रक्कम बेळगाव पोलिसांनी जप्त केली आहे.कर्नाटक-महाराष्ट्र सीमेवरील बेळगावी तालुक्यातील बाची चेकपोस्टवर पांडुरंगा नावाची व्यक्ती महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या बसमधून कागदपत्राशिवाय पैशांची वाहतूक करत होती.पाहणी दरम्यान एक पर्यटक बॅगेत 27 लाख 34 हजार रुपये सापडले.सध्या पोलिसांनी रक्कम जप्त केली असून पुढील तपास सुरू आहे.बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दर्ज केले आहे.