सुभाष मार्केट हिंडवाडी येथील लक्ष्मी मंदिरात  चोरी

  1. सुभाष मार्केट हिंडवाडी येथील लक्ष्मी मंदिरात  चोरी

खानापूर : प्रतिनिधी

सुभाष मार्केट , हिंडवादी,येथील लक्ष्मी मंदिरात सोमवार रात्री मुख्य दरवाजा व गाभार्‍याचा दरवाजा तोडून 6kg  चांदीचे दागिने लांबविण्याचा प्रकार घडला. गावच्या मध्यभागी भरवस्तीत लक्ष्मी मंदिर वसले आहे. अशा ठिकाणी चोरीचा प्रकार घडल्याने रहिवासीच्यात भीती पसरले आहे.

सोमवारी रात्री पुजार्‍यांना देवळाचा दरवाजा रात्री 10  बहुत खूबयांसह घटनास्थळी भेट दिली. यावेळी देवीच्या मूर्तीवरील दोन मंगळसूत्रे, एक नेकलेस, नथ, दोन बोरमाळ, एक टिक्का व लॉकेट असे चार तोळे सोन्याचे दागिने तसेच पंधरा तोळ्याच्या चांदीच्या बांगड्या असा अंदाजे सव्वादोन लाखांचा ऐवज चोरीला गेल्याचे दिसून आले.

बेळगावहून श्वानपथक बोलावून चोरट्यांचा माग काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण चोरट्यांचे कुठेच ठसे दिसून आले नसल्याने त्यांनी हात मोजे घालून सावधपणे चोरीचा प्रकार तडीस नेला असून हे सराईत चोरट्यांचे काम असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Previous post नगरसेवक अभिजीत जवळकर यांनी घेतला भाग्यनगर वसाहतीमधील कामांचा आढावा
Next post नगरसेवक नितीन जाधव यांनी घेतला आनंदवाडी वसाहतीमधील ड्रेनेज कामांचा आढावा