द.रा.बेंद्रे खुल्या रंगमंदिराचे आ. अभय पाटील यांचा हस्ते उद्घाटन
दत्तात्रय रामचंद्र बेंद्रे खुल्या रंगमंदिराचे उद्घाटन आमदार अभय पाटील यांच्या हस्ते रविवारी 26 मार्च रोजी व्हॅक्सिन डेपो मैदानावर करण्यात आले. अभय पाटील म्हणाले की, या सभागृहात नाटके, संगीत नाटके, वाद्यवृंद आदींचे आयोजन करण्यात येणार आहे. हा व्यासपीठ बेळगाव आणि परिसरातील नवीन कलागुणांना वाव देणारे ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केले. एक वर्षाच्या आत या मंचावर परदेशी नाटके सादर करण्याचा त्यांचा विचार असल्याचे त्यांनी सांगितले.
“एक शाम शाहिदों के नाम” हा संगीत कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला 500 प्रेक्षकांनी आपली उपस्थित दर्शवली . सर्व नागरिक सादरीकरणाने मंत्रमुग्ध झाले होते. नागरिकांनी सभागृह आणि कार्यक्रमासाठी अभय पाटील यांचे आभार मानले .
प्रत्येक गाण्याला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. यावेळी अभय पाटील म्हणाले की, या सभागृहा सकाळच्या वेळेत योग वर्गासाठी उपलब्ध असेल. कार्यक्रमावेळी प्रेक्षक, दक्षिण भागातील सर्व नगरसेवकांसह, स्मार्ट सिटीचे अधिकारी व इतर सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.