वॉर्ड क्रमांक २९ मध्ये बोअरवेलचे काम सुरू.
बेळगाव:
मंगळवारी वॉर्ड क्रमांक २९ मधील गवळी गल्ली , मंगळवार पेठ, टिळकवाडी, येथे आमदार अभय पाटील यांच्या आमदार निधीतून बोअरवेलच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला.
प्रभागातील रहिवाशांना उन्हाळ्यात पाण्याची कमतरता भासू नये यासाठी अभय पाटील यांनी आपल्या आमदार निधीतून एकच दिवशी 62 बोअरवेलचां कामाला चालना दिले होते. त्याचाच एक भाग म्हणून वॉर्ड क्रमांक २९, गवळी गल्ली, टिळकवाडी येथे बोअरवेलचे काम सुरू करण्यात आले.
नगरसेवक नितीन जाधव यांचा हस्ते कामाचे पूजन केले गेले .यावेळी स्थानिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
नगरसेवक नितीन जाधव यांनी आ.अभय पाटील यांचा आभार मानलें.