शुक्रवारी बंगळूर येथे एलॲन्डटी कंपनी बरोबर बैठक : आ.अभय पाटील
बेळगाव : प्रतिनिधी
शहरातील पाणीपुरवठ्याची समस्या निवारण करण्यासाठी नवीन पाईपलाईन घालण्याचे काम सुरु आहे. मात्र कॅन्टोन्मेंट हद्दीतून पाईपलाईन घालण्यासाठी अधिकाऱ्यांकडून सहकार्य मिळत नाही. त्यामुळे समस्या निर्माण झाली आहे. यासाठी सध्या 25 टँकरणे पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. यावर तोडगा काढण्यासाठी शुक्रवारी बंगळूर येथे नगर विकास खाते व एलॲन्डटी कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक बोलाविण्यात आली असल्याचे आ. अभय पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
कॅन्टोन्मेंट हद्दीतून 4 कि.मी. पाईपलाईन घालण्यासाठी वर्षाला 60 लाख रु. भाडे देण्याची अट घालण्यात आली आहे. अनेक दिवसांनंतर परवानगी देण्यात आली आहे. मात्र, यासाठी दिल्ली संरक्षण खात्याकडून परवानगी मिळविण्याची गरज असल्याचे कॅन्टोन्मेंट अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.