अवैज्ञानिक स्पीड ब्रेकरमुळे एका तरुणाचा बळी
बेळगाव :
बेळगावच्या महांतेशनगर सेक्टर क्रमांक 12 मध्ये लव्ह डेल खासगी शाळेजवळ बांधलेल्या अवैज्ञानिक स्पीड ब्रेकरने एका तरुणाचा बळी घेतला आहे.माहितीनुसार काल संध्याकाळीच हा स्पीड ब्रेकर बांधण्यात आला होता. उंच गतिरोधक बसविण्यात आल्यानंतर काही तासातचं काल रात्री उशिरा महांतेशनगर येथील रहिवासी 23 वर्षीय प्रतीक फकीरप्पा होंगल हा दुचाकीवरून येत असताना स्पीड ब्रेकरकडे लक्ष न देता त्याचे नियंत्रण सुटले आणि काही मीटर अंतरावर रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या टिप्परला धडक दिली. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर आता रविवारी रस्ता आणि स्पीड ब्रेकर निर्माण करणाऱ्यांवर तीव्र संताप व्यक्त करण्यात येताचं तो अवैज्ञानिक स्पीड ब्रेकर हटविण्यात आला आहे.