पोहण्यासाठी गेलेल्या दोन मुलांचा तलावात बुडून मृत्यू
बेळगाव :
हुक्केरी तालुक्यातील यादगुड गावात क्रिकेट खेळून शेत तलावात पोहण्यासाठी गेलेल्या 2 मुलांचा शेत तलावात बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना आज घडली. यमनाप्पा प्रकाश रेडरट्टी (वय 10) आणि येशू बसप्पा (वय 14) अशी पाण्यात बुडून मृत्यूमुखी पडलेले दुर्दैवी मुले आहेत.ही दोन मुले क्रिकेट खेळून शेत तलावात पोहण्यासाठी आली असताना रविवारी दुपारी 4.50 वाजेच्या सुमारास ही दुर्देवी घटना घडली. यमनाप्पा पाण्यात बुडत असताना येशूने त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला; पण तो अयशस्वी ठरला. बुडत असलेल्या यमनाप्पाला वाचवण्यासाठी गेलेला दुसरा मुलगा येशूचाही मृत्यू झाला आहे. हुक्केरी पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तपास केला. याप्रकरणी हुक्केरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.