आ.अभय पाटील यांच्या पुढाकाराने वडगांव येथे पाच कोटींची कामे सुरू.
बेळगाव प्रतिनिधी
बेळगाव दक्षिण विभागात येणार्या रस्त्यांच्या निर्मितीसाठी 5 कोटी रुपयांच्या विकास कामांना आमदार अभय पाटील यानी, रविवारी 19 माार्चला चालना दिली. शहरात एवढ्या मोठ्या प्रमाणावर विकासाचे काम ते करत आहेत ते विशेष कौतुकस्पद ठरले आहे.
बेळगाव दक्षिण मतदारसंघातील प्रत्येक क्षेत्राला प्राधान्य देऊन , विकासासाठी पावले उचलण्याचे काम आमदारांनी केले आहे. या सर्व कार्यक्रमाला विभागातील नगरसेवक आणि सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ओम नगर रस्त्याचे बांधकाम,ओम नगर अटलबिहारी वाजपेयी मार्गाचे बांधकाम, भारतनगर येथे पेव्हर्सच्या रस्त्याची निर्मिती करणार,भारतनगर 2 रा क्रॉस येथील रस्ता सुधारणार, वडगांव मधील वडर छावणी टेंगिन गल्ली येथे सीसी रस्त्याची निर्मिती , वडगांव येथील मलप्रभा नगर मधील गटारीचे बांधकाम ,बनशंकरी गल्लीतील रस्त्यांची सुधारणा , बनशंकरी गल्लीतील गटार बांधणे , जुने बेळगावमधील लक्ष्मी नगर येथे पेव्हर्सच्या रस्त्याची निर्मिती ,जुने बेळगावमधील एम जी रस्त्याची सुधारणा , शिवाजी गल्ली, वडगाव येथील रस्त्यांची सुधारणा , पाटील गल्ली पेव्हर्स रोड व ड्रेनेजचे बांधकाम , हालगेकर ग्राउंड पेव्हर रोड व भोवी समाज येरमळ रोड गटार बांधकाम, संभाजी नगर टेक्निका इंडस्ट्रीज आणि रणझुंजार 1 ल्या,2 या आणि 3 ऱ्या कॉस ला ड्रेनेजचे बांधकाम, शिव गणेश कॉलनी मध्ये पेव्हर्स आणि ड्रेनेज बांधकाम,आनंद नगर येथे रोड, गटार, आणि ड्रेनेज सुधारण. अशी 5 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. अशी माहिती यावेळी देण्यात आली.