शिवचरित्राचा लोकार्पण सोहळा हजारों शिवप्रेमींचा साक्षीने.

शिवचरित्राचा लोकार्पण सोहळा हजारो शिवप्रेमींचा साक्षीने.

बेळगाव : प्रतिनिधी

बेळगावकरांसाठी अभिमानाचा केंद्रबिंदू ठरणाऱ्या शिवचरित्र या भव्य प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा गुरुवारी सायंकाळी उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून आसाम राज्याचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सर्मा हे उपस्थित होते.ही भूमी पवित्र आहे.छत्रपती शिवाजी महाराज अनेकांचे आदर्श आहेत.आज मला इथे तिर्थयात्रेला आल्यासारखे वाटते,असे उद्गार आसामचे मुख्यमंत्री हिमांता बिस्वा सरमा यांनी काढले. आम्ही भारतीय व हिंदू आहोत. कायम एकत्र राहिल्यास जगात आपल्याला कुणीही पराजित करु शकत नाही. देशात चुकीचा इतिहास दाखवला जात आहे.तो इतिहास नवीन लिहिण्याची वेळ आली आहे. भारताचा इतिहास मोठा आहे. यात शिवरायांचे कार्य मोठे आहे. काँग्रेस नवीन भारताला दुर्बल करण्याचे काम करत आहे.

 

या सोहळ््याला बेळगाव आणि परिसरातून 50 हजाराहून अधिक नागरिकांची उपस्थिती होती. त्यामुळे या लोकार्पण सोहळ््यात जनसागराचे अथांग दर्शन घडल्याचे दिसून आले.तसेच बेळगावात निर्माण झालेला हा प्रकल्प देशातील एकमेव ठरला असल्याचे सांगून शिवरायांना वंदन केले. या प्रकल्पाचे प्रमुख संयोजक असणारे बेळगाव दक्षिणचे आ. अभय पाटील यांनी सदर प्रकल्प हा बेळगावकरांसाठी अभिमानाचा केंद्रबिंदू ठरेल, असा विश्‍वास व्यक्त केला.सदर प्रकल्प हा कोणा एकट्याचा नसून सर्व शिवप्रेमींचा आहे असे सांगीतले.

 

विजापूरचे आ. बसनगौडा पाटील यांनी बोलताना छत्रपती शिवाजी महाराज हे कोणत्याही ठराविक राज्यापुरते मर्यादित व्यक्तीमत्व नसून ते संपूर्ण हिंदू समाजाचे आराध्य दैवत असल्याचे सांगितले.आ. अनिल बेनके यांनी उपस्थितांचे स्वागत केले.व्यासपीठावर महापौर शोभा सोमनाचे,उपमहापौर रेश्‍मा पाटील भाजपचे राज्यनेते निर्मलकुमार सुराना, प्रवक्ते ॲड. एम. बी. जिरली, प्रकल्पाचे मार्गदर्शक डॉ. सर्जू काटकर, प्रा. डॉ. विनोद गायकवाड , नगरसेवक गिरीश घोंगडी, राजू भातकांडे, इतर मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Previous post ಚಿತ್ರರಂಗಕ್ಕೆ ಮತ್ತೊಂದು ಶಾಕ್: ಜನಪ್ರಿಯ ನಟ ಸಮೀರ್ ಖಾಖರ್ ವಿಧಿವಶ
Next post  १ किलो १०५ ग्रॅम गांजा जप्त, खानापूर पोलिसांची कारवाई