दि.15 मार्चला बसवेश्वर मूर्तीचे तर दि.16 मार्चला शिवचरित्र प्रकल्पाचे उद्घाटन : आ.अभय पाटील
बेळगाव :
दि. १६ तारखेला सायंकाळी पाच वाजता छत्रपती शिवाजी उद्यान येथील शिव चरित्र प्रकल्पाचे केंद्रीय मंत्री स्मृती आणि यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. छत्रपती शिवरायांच्या जीवनचरित्रावर आधारित काही महत्त्वाच्या ऐतिहासिक दृश्यांना ध्वनी आणि आकर्षक प्रकाश योजनेद्वारे दाखवण्यात येणार आहे.बुधवार दिनांक १५ रोजी गोवा वेस येथील जुन्या बसवेश्वर मूर्तीच्या जागी नव्याने बसविण्यात येणाऱ्या पंधरा फूट उंच भव्य बसवेश्वर मूर्तीच्या शिलान्यासाचा कार्यक्रम होणार आहे
या कार्यक्रमाला मुख्यमंत्री बसवराज बोम्मई उपस्थित राहणार आहेत.तीस लाख रुपये खर्चाच्या, सदर मूर्तीचे काम महाराष्ट्रतील कारागीराकडे सोपविण्यात आले आहे. या ठिकाणी सौंदर्यकरणासाठी वीस लाख रुपये खर्च केले जाणार आहेत. त्याचबरोबर पाच कोटी रुपये खर्च करून अनुभव मंडप निर्मितीही करण्यात येणार आहे. या कामासाठी माजी खासदार कोरें सोबत सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांची भेट झाली आहे. दीड एकर जागेत बसवेश्वरांच्या जीवनचरित्रावर आधारित अनुभव मंडप निर्मिती केली जाणार आहे. यासाठी मुख्यमंत्र्यांनी विशेष अनुदान देण्याचे ही मान्य केले आहे. अशी माहिती आ. अभय पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.