बेळगावजवळील हॉटेल कर्मचाऱ्यांकडून ग्राहकांवर प्राणघातक हल्ला: पोलीस स्थानकात तक्रार दाखल
बेळगाव :
जेवायला गेलेल्या आपल्या टीमला हॉटेल कर्मचाऱ्यांनी जबर मारहाण केली असे फिर्याद बेळगाव सोशल मीडिया मार्व्हल्स बेळगावचे अॅडमिन राकेश नंदागडकर यांनी पोलिसात दिली.
सुलगा येथील विशाल कंट्री साइड नावाच्या हॉटेलमध्ये ९ मार्चच्या रात्री सुमारे २५ जण जेवायला गेले असता तेथील कर्मचाऱ्यांनी त्यांना खूप वाईट वागणूक दिली आणि विनाकारण मारहाण केली असे तक्रारात म्हटलें आहे.
जखमी सहकारी रुग्णालयात उपचार घेतले.ते सर्व कर्मचारी उत्तर भारतातील होते आणि महिला सहकारी बरोबर सुध्दा अतिशय वाईट वर्तन केल्याची तक्रार राकेश यांनी केलं आहे.