हुपरी येथील कालव्यात मृतदेहासह जळालेली कार आढळली.
कोल्हापूर :
अमजद नदाफ हातकणंगले तालुक्यातील हुपरी येथील माळरानावरील जवाहर साखर कारखान्याच्या पूर्वेस असणाऱ्या कालव्यातील पाण्यात मारुती अल्टो कार जळालेल्या अवस्थेत आढळून आली. मात्र त्या गाडीमध्ये एक मृतदेहही आढळला आहे.
ही कार जळालेल्या अवस्थेत असल्याने घातपाताचा संशय व्यक्त केला जात आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिस घटनास्थळी दाखल झाले असुन, पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
या निर्जन माळरानावर कालवा आहे. आज (शनिवार)सकाळी पोलिसांना निनावी फोनद्वारे काही दिवसांपूर्वी कार कालव्यात पडल्याची माहिती मिळाली. घटनास्थळी सपोनि पंकज गिरी, पीएसआय गणेश खराडे, रावसाहेब हजारे सत्तापा चव्हाण आदी या ठिकाणी दाखल झाले.
त्यांनी क्रेनच्या साहाय्याने कार पाण्याबाहेर काढली. कार जळालेल्या अवस्थेत असुन, कारमध्ये एका तरुणाचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत सापडला. त्यामुळे या परिसरात खळबळ उडाली आहे. या भागातील एक तरुण गेल्या चार महिन्यांपासून बेपत्ता असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान या प्रकरणाने खळबळ माजली आहे. या घटनेचे गुढ उकलण्यासाठी पोलिस कसोशीने तपास करीत आहेत.