भाजपकडून सहकार क्षेत्राच्या प्रगतीसाठी अनेक योजना राबवणार : केंद्रीय सहकार राज्यमंत्री बी. एल. वर्मा

भाजपकडून सहकार क्षेत्राच्या प्रगतीसाठी अनेक योजना राबवणार :केंद्रीय सहकार राज्यमंत्री बी. एल. वर्मा

बेळगाव :

देशातील सहकार क्षेत्राला अधिक प्रगती साध्य करून देण्यासाठी भारतीय जनता पक्ष कटिबद्ध आहे. यासाठी आगामी काळात नव्या योजना आखण्यात येतील. अशी माहिती केंद्रीय सहकार राज्यमंत्री बी. एल. वर्मा यांनी दिली.

आगामी विधानसभा निवडणुकांसाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने जाहीरनामा तयार करण्यासाठी, सहकारी संस्थांच्या अपेक्षा आणि सूचना जाणून घेण्यासाठी विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

येथील  जिर्गे ऑडीटोरियम मधील डॉ. कोडकानी सभागृहात झालेल्या या बैठकीत त्यांनी विविध सहकारी संस्थांसाठी आखलेले  योजना बद्दाल त्यांनी मार्गदर्शन केले. यावेळी बोलताना ते म्हणाले की अनेक राज्यांमध्ये सहकाराची प्रगती कौतुकास्पद आहे अशावेळी त्यांना अधिक प्रोत्साहन देण्याची गरज आहे.यासाठी आवश्यक योजना राबविण्याचा प्रयत्न राहील.

प्रस्ताविक श्री दादागौडा बिरादरा, सरचिटणीस, महानगर जिल्हा यांनी केले .यावेळी श्री.बी.एल.वर्मा, केंद्रीय राज्यमंत्री, सहकार क्षेत्र व ईशान्य राज्यांचे विकास मंत्री, उत्तर मतदारसंघाचे आमदार व बेळगाव महानगर जिल्हा अध्यक्ष श्री.अनिल बेनाके, माजी आमदार व ग्रामीण अध्यक्ष श्री.संजय पाटील , उपमहापौर सौ.रेश्मा पाटील, प्रदेश प्रवक्त्या एम.बी.झिराली, माजी उपाध्यक्ष महंतश कवटगीमठ, व्यासपीठवर उपस्थित होते.

यावेळी महानगर जिल्हा सरचिटणीस श्री.दादा गौडा बिरादर, श्री.मुरगेंद्र गौडा पाटील, उत्तरा मंडळाचे अध्यक्ष.विजया कोडगनूर, दक्षिणा मंडळाच्या अध्यक्षा श्रीमती गीता सुतार, बेळगावी जाहीरनामा सल्लागार सह-संयोजक श्री.इरय्या खोत, सौ.सारिका पाटील, श्री.श्रीनिवास बिसनकोप्प, माध्यम प्रमुख श्री.शारद पाटील, सोशल मीडिया समन्वयक श्री.केदार जोरापुर, नगरसेवक व सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Previous post महेश कुमतल्ली यांना तिकीट न मिळाल्यास मीही निवडणूक लढवणार नाही : रमेश जारकीहोळी
Next post हुपरी येथील कालव्यात मृतदेहासह जळालेली कार आढळली.