नगरसेवक गिरिश धोंगडी यांच्या पुढाकाराने जागतिक महिला दिनानिमित्त स्त्री-शक्ती महिला मंडळाची स्थापना
बेळगाव : प्रतिनिधी
आ.अभय पाटील यांचा मार्गदरशना खाली , बेळगाव शास्त्रीनगर येथील पाटीदार सभागृहात ११५ वा जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
प्रमुख पाहुणे म्हणून महापौर सौ. शोभा सोमनाचे, भारतीय जनता पक्षाच्या अध्यक्षा सौ.गीता सुतार , वॉर्ड नं. 24 चे नगरसेवक श्री गिरिश धोंगडी, आणि भाजपचे कार्यकर्ते श्री.विनायक हावळणाचे उपस्थित होते .
प्रारंभी, मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे महापौर सौ. शोभा सोमनाचे आणि भारतीय जनता पक्षाच्या अध्यक्षा सौ. गीता सुतार, यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी नगरसेवक श्री गिरिश धोंगडी यांनी सर्व महिलांना शुभेच्छा देऊन, आज महिला प्रत्येक क्षेत्रात पुरुषांप्रमाणे आघाडीची कार्यतत्परता बजावत आहेत, असे आपले विचार मांडले. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने, त्याांनी स्त्री-शक्ती महिला मंडळाची स्थापना केली.
सूत्रसंचालन श्रीमती रश्मी कदम व आभार प्रदर्शन श्रीमती वैशाली पिसे यांनी केले. ह्या कार्यक्रमाला ७वा क्रॉस शास्त्री नगरचे समस्त स्त्री-शक्ति मंडळ उपस्थित होते.