भाजपच्या महानगर व बेळगाव ग्रामीण जिल्ह्याच्या वतीने शहरात विजयोत्सव साजरा
बेळगाव :
कित्तूर चन्नम्मा सर्कल येथे फटाके वाजवून आणि मिठाई वाटून विजयोत्सव साजरा करण्यात आला. त्रिपुरा, मेघालय आणि नागालँड या तिनही राज्यात भाजपने आता आपली सत्ता स्थापन केली आहे.
ईशान्येकडील तीन राज्यांमध्य नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने यश मिळविले आहे. त्याबद्दल महानगर भाजपच्या वतीने शहरात विजयोत्सव साजरा करण्यात आला.
याबद्दल यावेळी उपस्थित नेत्यांनी विचार मांडले. तसेच येणाऱ्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत देखील भाजप असेच यश मिळवेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. या विजयोत्सव कार्यक्रमात भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते.