मजगाव येथील तरुणाचा चाकू भोसकून खून

मजगाव येथील तरुणाचा चाकू भोसकून खून

बेळगाव :

मजगाव येथील तरुणाचा चाकू भोसकून खून केल्याची घटना मच्छे येथे शेतवाडीत घडली आहे.याबाबत पोलीस सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार मजगाव लक्ष्मी गल्लीतील प्रतीक एकनाथ लोहार (वर्ष 23 ) या युवकाला गावातील एका तरुणाने आपल्या दुचाकीवरून मच्छे ब्रह्मलींग मंदिरा शेजारी शेतवाडीमध्ये बोलावून नेले. तेथे प्रतीकचा चाकू व जांभ्या भोसकून खून करण्यात आला. मयत प्रतीक लोहार याचा खून करून सदर आरोपी गावात फिरत असल्याची माहिती मिळाली.

आरोपीला फिरत असताना काही तरुणांनी पाहिले. त्यांनी आरोपीला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र आरोपी तरुणांच्या हातातून निसटून फरारी झाला. वडगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात सदर प्रकरणाची नोंद झाली आहे. प्रतीक लोहार याचा खून करण्याचे कारण मात्र अद्याप अस्पष्ट असून वडगाव ग्रामीण पोलीस पुढील तपास करीत आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Previous post धरणात बुडून पिरनवाडीच्या युवकाचा मृत्यू
Next post ಚಿತ್ರರಂಗಕ್ಕೆ ಮತ್ತೊಂದು ಶಾಕ್: ಹಿರಿಯ ನಟ, ನಿರ್ದೇಶಕ ಸತೀಶ್ ಕೌಶಿಕ್ ವಿಧಿವಶ