धरणात बुडून पिरनवाडीच्या युवकाचा मृत्यू
बेळगाव :
धूली वंदना निमित्त रंग खेळून झाल्यावर मित्रांसोबत धरणावर अंघोळ करण्यासाठी गेलेल्या युवकाचा पाण्यात बुडून दुर्दैवी अंत झाल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली आहे.बेळगाव तालुक्यातील खादरवाडी येथील धरणात बुडून या युवकाचा मृत्यू झाला आहे. अविनाश अरविंद देवलेकर वय 22 रा. सिध्देश्वर गल्ली पिरनवाडी असे या युवकाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अविनाश हा मंगळवारी दुपारी मित्रांसोबत होळी झाल्यावर अंघोळ करण्यासाठी धरणात गेला होता त्यावेळी तो बुडाला आहे. अविनाश सायन्स डिग्री होल्डर होता. त्याच्या पश्चात आई, भाऊ असा परिवार आहे.
मंगळवारी दुपारी धरणात बुडल्यानंतर सायंकाळी त्याचा मृतदेह मिळाला. त्या नंतर अंतिम संस्कार करण्यात आले.बेळगाव ग्रामीण पोलिसात फिर्याद दाखल करण्यात आली आहे.