“होळी मिलन” कार्यक्रमात सहभाग होण्यासाठी आ.अभय पाटील कडून नागरिकांना आवाहन.
बेळगाव :
आमदार अभय पाटील ,हे नेहमी हिंदू संस्कृती आणि परंपरा जपण्या साठी पुढाकार घेत असतात . त्याचाच एक भाग म्हणून ते होळी निमित्ताने रंगपंचमी खेळण्यासाठी व्यकसिन डेपो मैदान येथे मोठ्या प्रमाणात होळी मिलन कार्यक्रम आयोजन करतात.
मागील अनेक वर्षे आ. अभय पाटील या कार्यक्रमांचे आयोजन करत आहेत.परंतु मध्यंतरी दोन वर्षे कोरोनामुळे या कार्यक्रमांचे आयोजन होऊ शकले नव्हते.परंतु गेल्या वर्षापासून कुठलेही निर्बंध नसल्या मुळे हा कार्यक्रम साजरा करण्यासाठी परिपूर्ण व्यवस्था करण्यात येत आहे असे आ. अभय पाटील यांनी सांगीतले .
टिळकवाडी येथील व्हॅक्सिन डेपो मैदान येथे मंगळवारी होली मिलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून होळीचा आनंद द्विगुणित करण्यासाठी योग्य व्यवस्था करण्यात आली आहे.कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे येथे उत्तम प्रकारचा DJ उपलब्ध असणार आहे. या DJ च्या माध्यमातून बहारदार संगीतमय आणि दणक्यात जोरदार आवाजाच्या तालावर होळी-रंगपंचमी साजरी करण्याची संधी बेळगावकरांना मिळणार आहे.
नागरिकांनी यामध्ये सहभागी होऊन कार्यक्रमांला यशस्वी करण्याचं आवाहन आ.अभय पाटील यांनी केली आहे.