पंतप्रधानांच्या दौऱ्याबाबत पूर्वतयारी जोरात….दक्षिण बेळगाव सजले…
बेळगाव : प्रतिनिधी
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दि. 27 रोजी बेळगाव दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या या दौऱ्यासंदर्भात पूर्वतयारी बेळगाव दक्षिणचे आ. अभय पाटील यांच्या मार्गदर्शन खली जोरात सुरू आहे. आ.अभय पाटील हे स्वतः सर्व कार्यकर्ता बरोराबर अहोरात्र काम करत आहेत.
पंतप्रधान मोदींच्या स्वागतासाठी , दहा हजार महिला भगवा फेटा बांधून तसेच पूर्णकुंभ घेऊन स्वागत करणार आहेत . त्याचबरोबर दहा हजार ध्वज लावण्यात आले आहेत.
.त्याचप्रमाणे पंतप्रधान मोदी सहभागी झालेल्या कार्यक्रमातील फोटोंचे १०८ ध्वज तयार करून लावण्यात आले आहेत.
शिवाय देशातील ३० महापुरुषांच्या जीवनावर आधारित घटनांचे जिवंत देखावे देखील सादर केले जाणार आहेत.बेळगाव दक्षिण मधील सुमारे एक हजाराहून अधिक कार्यकर्ते या रोड शोच्या तयारीसाठी अहोरात्र झटत असल्याचे त्यांनी सांगितले .
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा दौरा लक्षवेधी असणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांचे आगमन होत आहे. त्यामुळे पक्ष कार्यकर्त्यांनी जाहीर सभेत मोठ्या संख्येने उपस्थित असतील ह्याचा ग्वाही आ. अभय पाटील यांनी दिली.यावेळी पक्ष कार्यकर्ते आणि नगर सेवक बहुसंख्येने उपस्थित होते.