जलशुद्धीकरण यंत्र बसविताना गैरव्यवहार झाल्याच आरोप. अहवाल समितीने विधान सभेत मांडलं आहावाल.
बेळगाव : प्रतिनिधी
राज्यातील तब्बल आठ हजार शुद्धीकरण यंत्रांमधील पाणी अपायकारक असल्याचा अहवाल आ. अभय पाटील यांच्या अध्यक्षतेखाली समितीने दिला आहे. त्या समितीचा अहवाल सोमवारी मांडण्यात आला.
बेळगाव शहरातील 14 ठिकाणी अशी यंत्रे बसविण्यात आली आहेत. ती निकामी ठरली आहेत. समितीच्या अहवालामुळे त्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. राज्यातील जलशुद्धीकरण यंत्रांचा अभ्यास करण्यासाठी आ. अभय पाटील यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली होती.
त्या समितीने चौकशी करून अहवाल सादर केला आहे. यंत्रांच्या माध्यमातून जलशुद्धीकरण होणे अपेक्षित आहे. पण, जलशुद्धीकरण निकषांचेच उल्लंघन करण्यात आल्याचा अहवालात म्हण्यात आला आहे. शिवाय ही यंत्रे बसविताना गैरव्यवहार झाल्याचेही म्हटले आहे.