शिवचरित्र प्रकल्प येथील होम – हवन कार्यक्रम उत्साहात साजरा.
बेळगाव :
येथील डॉ. एस.पी.एम. रोड येथील छत्रपती शिवाजी उद्यानाशेजारी उभारण्यात आलेल्या शिवचरित्र प्रकल्प येथे शिवजयंतीदिनी वास्तूशांतीचे पूजन आणि होमहवन आदी कार्यक्रम पार पडले.
या शिवचरित्र प्रकल्पाचे लोकार्पण योग्यवेळी लवकरच करण्यात येणार आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून छत्रपती शिवरायांचे चरित्र सामान्य जनतेसमोर मांडण्याचा प्रयत्न होत आहे. छत्रपती शिवरायांच्या जीवनातील अनेक स्फूर्तीदायक प्रसंग जाणून घेण्याकरिता या प्रकल्पाला नागरीक नियमित भेट देतील.
उत्कृष्ट पद्धतीच्या चित्रकृती तसेच दर्जेदार असा लाईट अँड साउंड शो हे या प्रकल्पाचे वैशिष्ट्य आहे. याच्या भूमीपूजनानंतर माध्यमांशी बोलताना आ. अभय पाटील यांनी हा प्रकल्प एक आदर्श प्रकल्प ठरेल, असा विश्वास व्यक्त केला.
सदर प्रकल्प उभारणीसाठी आमदार निधी तसेच बुडा निधीमधून खर्च करण्यात आला असल्याची माहिती देखील त्यांनी दिली.