निवडणूक आयोगाचा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का :शिवसेना आणि धनुष्यबाण एकनाथ शिंदे गटाकडे
नवी दिल्ली : शिवसेना पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण
एकनाथ शिंदे यांना निवडणूक आयोगानं दिलं आहे. हा
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का मानला जातोय. एएनआयने
याबाबतचं वृत्त दिलेय. निवडणूक आयोगानं उद्धव ठाकरे
गटाला मोठा धक्का दिला आहे. शिवसेना हे नाव एकनाथ
शिंदे यांना दिलं आहे. त्याशिवाय पक्षाचं चिन्ह धनुष्यबाण
हेही एकनाथ शिंदे यांना देण्यात आले आहे.
एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांना घेऊन शिवसेना
पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर
शिवसेना पक्षावर आणि चिन्हावर त्यांनी दावा केला होता.
निवडणूक आयोगासमोर याची लढाई सुरु होती. आज
निवडणूक आयोगानं याबाबतचा निर्णय दिला आहे. यात
उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. धनुष्यबाण हे
चिन्ह आणि शिवसेना हे नाव देखील मिळालं आहे. त्यामुळे
यापुढे एकनाथ शिंदे यांचीच शिवेसना असणार आहे. ठाकरे
कुटुंबाकडून शिवसेना निसटली आहे.