नगरसेवक नितीन जाधव यांच्या पुढाकाराने गुरुवार पेठ येथील ब्लॉक स्पॉट हटविण्यात आला : नागरिकांकडून कौतुक.
बेळगाव:
माननीय आमदार अभय पाटील साहेब यांच्या मार्गर्शनाखाली.. व नगरसेवक नितीन ना जाधव यांच्या पुढाकाराने हल्लीच वॉर्ड नं 29 येथील आरपीडी कॉर्नर , खानापूर रोड येथील जो ब्लॅक स्पॉट होता तो स्वच्छ करून त्याच बाजूला उंडर ग्राउंड डस्टबीन बसविन्यात आलं आहे त्याचा नागरिकांनी उपयोग करावे असे आवाहन कॉर्पोरेटर नितीन जाधव यांनी केले होते.
तसेच गुरवार पेठ कॉर्नर टिळकवाडी येथील कित्तेक वर्षा पासून असलेला ब्लॅक स्पॉट बंद करण्यात आला तसेच परिसरातील नागरिक व दुकानदारांना अवाहान करण्यात आले की या पुढे हया ठिकाणी कोणीही कचरा टाकू नये टाकल्यास महानगरपालिके तर्गे दंडात्मक कारवाई करण्यात येईल असे नागरिकांना सांगण्यात आले.
या वेळी sanitory इन्स्पेक्टर कलावती मॅडम, गजानन मुळीक, संतोष पाटील. शिवकुमार बल्लोळी, कपिला मजुकर, विश्वनाथ नाईक, धीरज जाधव व अन्य नागरिक उपस्थित होते.
नगरसेवक नितीन जाधव ह्यांचा सर्व नागरिकांकडून कौतुक होत आहे.