आमदार अभय पाटील यांचे शिवप्रेम पुन्हा झळकले .आमदार निधीतून 80 लाख रू.मंजूर
बेळगाव:
पिरनवाडी येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याकडील प्रांगणाच्या सुशोभीकरणाचा आणि त्या ठिकाणी संरक्षण भिंत बांधण्याचा विचार पिरानवडी गावकऱ्यांनी आ.अभय पाटील ह्यांच्यासमोर मांडला होता.
आ.अभय पाटील यांचे हिंदूंचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराजांवर असलेले प्रेम काही नवीन नाही. त्यांच्या कार्यातून नेहमीच त्यांच्या शिवप्रेमाची प्रचिती पाहायला मिळते. आ.अभय पाटील हे लवकरच आपले ड्रीम प्रोजेक्ट शिवचरित्रचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करणार असून आता पिरनवाडी येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या प्रांगणाचे सुशोभीकरण करण्यासाठी देखील त्यांनी पुढाकार घेतला आहे.
आ. अभय पाटील यांनी लागलीच संरक्षण भिंत आणि सुशोभीकरणासाठी रू.60 लाख मंजूर करून या कामाला सुरुवात केली. आणि आता संरक्षण भिंतीचे काम पूर्णत्वाला येऊन ठेपलयं.
येत्या 19 फेब्रुवारीला चौथरा कामाचे भूमिपूजन आ.अभय पाटील ह्यांच्या हस्ते करण्यात येणार असून आ. अभय पाटील यांनी चौथरा कामासाठी रू.20 लाख मंजूर केले आहेत.
येथे उभारण्यात येत असलेल्या भव्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी गावातून वर्गणी काढणार असल्याचेही गावकऱ्यांनी सांगितले आहे.एकंदरीत या सर्व कामातून आ.अभय पाटील यांचे शिवप्रेम सातत्याने दिसून येते.