महानगरपालिकेवर किंगमेकरचा करिष्मा..महापौरपदी शोभा…उपमहापौरपदी रेश्मा
बेळगाव प्रतिनिधी
बेळगाव महानगरपालिकेवर भाजपची सत्ता आल्यानंतर देखील दीड वर्षापर्यंत महापौर उपमहापौर पदाची निवडणूक झाली नव्हती. त्यामुळे या निवडीमध्ये महापौर उपमहापौर पद कोणाला मिळणार याविषयीची उत्सुकता शिगेला पोचली होती.
यामधून भाजपने आता शोभा सोमनाचे यांची महापौर आणि रेश्मा पाटील यांची उपमहापौरपदी निवड केली आहे या दोघांची निवड जाहीर झाल्यामुळे मनपावर भाजपचे निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित झाले आहे. पक्षातील वरिष्ठ नेते मंडळींच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीनंतर या उमेदवारांच्या निवडीचा निर्णय जाहीर करण्यात आला या पदांच्या निवडीसाठी बेळगाव दक्षिणचे आ.अभय पाटील हे किंगमेकर ठरले असल्याचे दिसून आले.
आरक्षणाच्या कारणामुळे महापौर पदासाठी भाजपचा महिला नगरसेविकेला संधी मिळणार हे स्पष्ट झाले होते. मात्र उपमहापौर पदासाठी अन्य नगरसेविकेला संधी मिळेल अशी चर्चा होती . परंतु भाजपच्या नेते मंडळींनी रेश्मा पाटील यांच्यासाठी संधी देण्याचे ठरविल्यामुळे हा मार्ग मोकळा झाला.
बेळगाव महापालिका निवडणूक झाल्यानंतर तब्बल 17 महिन्यांनी बेळगावकरांना सोमवारी महापौर व उपमहापौर लाभला आहे.