शिवजयंतीदिनी शिवचरित्र प्रकल्पाचे लोकार्पण :अभय पाटील
बेळगाव : प्रतिनिधी
छत्रपती शिवाजी उद्यानातील शिवचरित्र प्रकल्पाचे काम पूर्ण झाले असून याचे लोकार्पण दि. 19 फेब्र. केले जाणार आहे. उद्घाटनासाठी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई, आसामचे मुख्यमंत्री व इतरांना आमंत्रित करण्यात आले आहे, अशी माहिती आ. अभय पाटील यांनी सांगीतले.
शिवचरित्र प्रकल्पाचे काम सुरू होऊन अनेक वर्षे उलटली आहेत. यापूर्वी दोनवेळा प्रकल्पाचे उद्घाटन घाई गडबडीत अभय पाटील ह्याांना श्रेय मिळूं न्हवे म्हणून बरीच कामे शिल्लक राहिली असताना सुध्दा उद्घाटन केलं गेलं.
आता या प्रकल्पात शिवरायांचे संपूर्ण चरित्र मराठी आणि कन्नड अशा दोन्ही भाषेत दर्शविले जाणार आहे. आता याठिकाणी साउंड आणि लाईट शो यांच्या माध्यमातून हे चरित्र पाहण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे बेळगाव परिसरातील शिवप्रेमी नागरिकांसाठी हे एक आदर्श केंद्र बनेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.