महापौर पदासाठी शोभा सोमणाचे तर उपमहापौर पदासाठी रेश्मा पाटील यांचे नाव आघाडीवर…
बेळगाव
बेळगाव : महापौर उपमहापौर निवडणुकीसाठी अनगोळ
येथील नगरसेविका शोभा सोमनाचे तर शाहू नगरच्या
नगरसेविका रेश्मा पाटील यांची नावे आघाडीवर असून
दोघीही नगरसेविकांनी नामांकन दाखल केले आहे. भाजप
कोअर कमिटीच्या झालेल्या बैठकीत महापौर उपमहापौर
उमेदवार अंतिम करण्यावर सविस्तर चर्चा झाली असून त्या
बैठकीत शोभा सोमाणाचे यांची महापौर तर रेश्मा पाटील
यांची उपमहापौर पदी निवड करण्याचे शिक्कामोर्तब
झाल्याचे समजते.
दोन्ही उमेदवारांनी सकाळीच नामांकन केले असून दुपारी
तीन वाजता मतदान प्रक्रियेला सुरुवात होणार
आहे. महापौर पदासाठी काँग्रेसने निवडणूक न
लढविण्याचा निर्णय घेतला असल्याने महापौर निवडणूक
बिन विरोध होण्याची शक्यता आहे तर उपमहापौर
पदासाठी रेश्मा पाटील आणि समितीच्या वैशाली भातकांडे
यांच्यात निवडणूक होऊ शकते.
सत्तारूढ गट नेते पदी राजू डोणी यांची भाजप कोअर
कमिटीने निवड केली असल्याचे समोर येत आहे.