सोमवार 6 फेब्रुवारी रोजी बेळगाव महापालिकेचा महापौरा निवडणूक
बेळगाव –
सोमवार 6 फेब्रुवारी रोजी बेळगाव महापालिकेचा महापौरा निवडणूक होणार असून महापालिकेत स्पष्ट बहुमत असलेल्या भाजपची उद्या रविवारी सायंकाळी महापौर आणि उपमहापौरांची नावे निश्चित करण्यासाठी बैठक होणार आहे.
बेळगावचा उपमहापौर कोण होणार याबाबत उद्या रविवारी बेळगावात होणाऱ्या बैठकीत निर्णय होण्याची शक्यता आहे.
या बैठकीला बेळगाव जिल्हा भाजपचे प्रभारी निर्मलकुमार सुराणा, आमदार अभय पाटील, अनिला बेनाके, व भाजपचे सर्व शहर कार्यकर्ते सहभागी होणार असून, निर्मलकुमार सुराणा हे सर्वांची मते ऐकून निर्णय घेणार आहेत.
महापौरपद सर्वसाधारण महिलेसाठी राखीव आहे, उपमहापौरपद मागासवर्गीय ब वर्ग महिलेसाठी राखीव आहे, नगराध्यक्षपद भाजपच्या नगर सेवकासाठी आहे.
सक्रिय कार्यकर्त्या सारिका पाटील, वाणी विलास जोशी, शोभा सोमनाचे, दीपाली टोपगी यांची नावे ऐकायला मिळत आहेत.उपमहापौरपदासाठी वैशाली भातखंडे आणि रेशा पाटील यांच्या नावाची चर्चा आहे.उच्चाधिकार बैठकीत नाव निश्चित होणार आहे. बेळगावात उद्या भाजपची बैठक होणार असून सोमवारी महापौर आणि उपमहापौरपदाची निवडणूक बिनविरोध होणार आहे.