आ.अभय पाटील ह्यांचा इफेक्ट…आरोपी झाला अटक.
बेळगाव:
दि.24.जानेवरी रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या फोटो एडिट करून सोशल मीडियावर टाकणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, जेणेकरून इतरांना असे कृत्य करण्यास वचक बसेल अशी मागणी आ.अभय पाटील यांनी केली होती.
या संदर्भात आ . अभय पाटील यांनी बेळगाव महापालिकेच्या नगरसेवकांसह , पोलीस आयुक्त , डॉ . एम जी बोरलिंगय्या यांची भेट घेऊन , शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची विटंबना करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी अशी मागणी केली होती .यावेळी , प्रसारमाध्यमांना माहिती देताना आ . अभय पाटील यांनी सांगितले कि , शिवाजी महाराजांचे फोटो ह्या पद्धतीने एडिट करणं ही गंभीर बाब असून , यामुळे समाजाची शांती भंग होऊ शकते .
याची दखल घेऊन, बेळगाव शहराच्या पोलीस आयुक्तांची भेट घेऊन शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची विटंबना करणाऱ्यांना अटक करण्यात यावी, असे निवेदन दिले होते. धर्मांधांना शहाणपण शिकवायचे असेल तर उत्तर प्रदेश मॉडेलनुसार दोषींची मालमत्ता जप्त केली पाहिजेत असेही म्हणाले होते. .पोलीस आयुक्त डॉ.बोरलिंगय्या यांनी गुन्हा दाखल करून आरोपींना अटक करण्याचे आश्वासन दिले होते. यासंदर्भात आ . अभय पाटील ह्यांनी रोज पाठपुरावा केल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचे फोटो एडिट करून सोशल मीडियावर टाकणाऱ्या नराधमाला पोलिसांनी अटक करून हिंडलगा जेलला रवाना केले.
ह्या संदर्भात, प्रसारमाध्यमांना माहिती देताना नगरसेवक राजू भातखंडे आणि जयंत जाधव यांनी सांगितले कि ,आमदार अभय पाटील यांच्या पुढाकारामुळे ह्या कारवाईला गती आली आणि त्या नराधम इम्रान खान ह्याला बंगळूर मधून अटक करून बेळगाव येथील हिंडलगा जेल मध्ये रवाना केले.
ते पुढे म्हणले पोलीस आयुक्त डॉ.बोरलिंगय्या आणि शहापूर पोलीस ह्यांनी गुन्ह्याची दखल घेवून आरोपींना इतक्या लवकर अटक केल्या बद्दल आभार मानले.