सीडी प्रकरणास डी. के. शिवकुमार हेच जबाबदार ; रमेश जारकीहोळ
बेळगाव :
माझ्या विरोधात सातत्याने षडयंत्र केले जात आहे. कथित सीडी प्रकरणाव्दारे माझे वैयक्तिक जीवन उध्वस्त करण्याचा प्रयत्न झाला आहे. या सर्वा मागे काँग्रेस नेते डी. के. शिवकुमार हेच कारणीभूत आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून राज्यातील बडे राजकारणी तसेच अधिकाऱ्यांना सीडीच्या माध्यमातून ब्लॅकमेल करण्याचे काम केले जात आहे.
या संदर्भात आपण सीबीआयकडे चौकशीची मागणी करत आहोत. ग्रामीण आमदारांच्या साखर कारखान्याची चौकशी केली जावी,अशी मागणी माजी मंत्री व भाजप आमदार रमेश जारकीहोळी यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केली आहे.
यावेळी पुढे बोलताना रमेश जारकीहोळी म्हणाले, डी. के.शिवकुमार यांच्याशी माझे घनिष्ठ मित्रत्वाचे संबंध होते. मात्र बेंगलोर येथील एका जागे प्रकरणानंतर आमच्या मतभेद निर्माण झाले. ते मतभेद आता टोकाला गेले आहेत. डी.के.शिवकुमार यांनी मोठा काळा पैसा जमवीला आहे.
डी.के.शिवकुमार यांनी माझे राजकीय आणि वैयक्तिक जीवन उध्वस्त करण्याचा प्रयत्न केला आहे. डी. के. शिवकुमार यांना राजकारणात राहण्याची पात्रता नाही. सीडी प्रकरणाच्या माध्यमातून माझे वैयक्तिक जीवन उध्वस्त करण्याचा प्रयत्न झाला आहे. अशाच प्रकारे राज्यातील अनेक बडे राजकारणी आणि अधिकाऱ्यांना ब्लॅकमेल केले जात आहे.
माझ्या विरोधात रचण्यात आलेल्या त्या सीडी प्रकरणातील युवती आणि दोघांची तात्काळ अटक करण्यात यावी. त्यांची सखोल चौकशी करण्यात यावी. या संदर्भात आपण सीबीआयकडे सखोल चौकशीची मागणी करणार आहोत. चौकशी अंती डी. के. शिवकुमार यांना निश्चितच अटक होईल. सीडी प्रकरणातील ती युवती बेंगळूरातील एका काँग्रेस महिला पदाधिकाऱ्यांच्या घरात असल्याचा दावाही, रमेश जारकीहोळी यांनी केला आहे.