बलून फेस्टिवलमुळे बालवर्गाचा आनंद सोहळा साजरा: आ. अभय पाटील

बलून फेस्टिवलमुळे बालवर्गाचा आनंद सोहळा साजरा: आ. अभय पाटील

बेळगाव :

आ. अभय पाटील यांनी आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सवाचा एक भाग म्हणून सोमवारी बलून फेस्टिवल पार पडला. राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या मालिनी सिटी येथे हा महोत्सव भरविण्यात आला आहे.

पतंगाच्या बरोबरीने फुग्यांची झालेली आकर्षक उधळण लक्षवेधी ठरली होती. त्यामुळे रंगीबेरंगी फुग्यांनी आकाश व्यापून गेले. बालचमूसाठी हा आगळा-वेगळा आनंदसोहळा ठरला. यामध्ये अनेक चित्तवेधक फुगे उडवून या महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले.

संतोष (अण्णा) पाटील यांच्या हस्ते हे उद्घाटन झाले. यावेळी आ. अभय पाटील यांच्यासह नगरसेवक-सेविका आणि कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते. या सोहळ््यात बालचमुला फुग्यांची आकर्षक भेट मिळाली.

या महोत्सवाच्या निमित्ताने झालेल्या खाद्य महोत्सवाला नागरिकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. चटकदार खाद्यपदार्थ्यांचे स्टॉल्स याठिकाणी मांडण्यात आले आहेत. तेथे ग्राहकवर्ग खाद्यपदार्थांचा आस्वाद घेत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Previous post ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿ ನಿತೇಶ್ ಪಾಟೀಲ ಅವರಿಗೆ ರಾಜ್ಯಮಟ್ಟದ ಅತ್ಯುತ್ತಮ “ಜಿಲ್ಲಾ ಚುನಾವಣಾಧಿಕಾರಿ” ಪ್ರಶಸ್ತಿ
Next post ಲಂಚ ಸ್ವೀಕರಿಸುವಾಗ ಲೋಕಾಯುಕ್ತ ಬಲೆಗೆ ಬಿದ್ದ ಚಿಕ್ಕೋಡಿ ಸಬ್ ರಿಜಿಸ್ಟ್ರಾರ್