सरकारी सुट्टीदिनी व्ही. एम. गोठेकर यांनी स्वीकारली खानापूर तहसीलदारपदाची सूत्रे
खानापूर, दिनांक 22 (प्रतिनिधी) :
व्ही. एम. गोठेकर यांची खानापूर तहसीलदारपदी नियुक्ती करण्यात आली असून त्यांनी आज रविवारी चक्क शासकीय सुट्टीदिनी पदभार सांभाळला.
तहसीलदार प्रवीण जैन यांची बदली झाल्यानंतर खानापूर तहसीलदार पद रिक्त होते. तब्बल दीड महिना रिक्त असलेल्या या पदावर कोणाची वर्णी लागते, याकडे खानापूरवासीयांचे लक्ष लागून होते.
या पदावर नूतन तहसीलदार म्हणून व्ही. एम. गोठेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी या आधी बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयातील डीव्हीडीसी अधिकारी म्हणून सेवा बजावली असून आज रविवारी त्यांनी खानापूर तहसील कार्यालयात तहसीलदार म्हणून पदभार स्वीकारला.
यावेळी उपतहसीलदार के. एम. कोलकार यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. याप्रसंगी खानापूर तहसील कार्यालयातील द्वितीय श्रेणी तहसीलदार व्ही. आर. मॅगेरी यासह व्ही. एस. हिरेमठ, सुनिल देसाई, मंजुनाथ आदी कर्मचारी उपस्थित होते.