पतंग महोत्सवाला आणि सांस्कृतिक कार्यक्रमला उदंड प्रतिसाद
बेळगाव :
आ. अभय पाटील आयोजित आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सवातील विविध उपक्रम लक्षवेधी ठरले आहेत. यामध्ये सर्व वयोगटातील नागरिकांचा सहभाग दिसून येत आहे.
तसेच बेळगावकरांसाठी हा महोत्सव आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे. शहरातील मालिनी सिटी याठिकाणी आयोजित या महोत्सवामध्ये विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
पतंग महोत्सवामध्ये देश-विदेशातील पतंगबाज सहभागी झाले आहेत. त्यांनी हा महोत्सव अत्यंत लक्षवेधी ठरला असल्याची प्रतिक्रिया नोंदविली आहे.
या महोत्सवाच्या बरोबरीने विविध प्रकारच्या स्टॉलची मांडणी आणि विविध आकर्षक कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आले आहेत. त्यांना उदंड प्रतिसाद मिळत आहे.
याच कार्यक्रमात शनिवारी सायंकाळी बालमहोत्सव आणि डीजे नाईट हा कार्यक्रम पार पडला. याला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला.