आ. अभय पाटील आयोजित अंतरराष्ट्रीय पतंग महोत्सवचा शुभारंभ.

आ. अभय पाटील आयोजित अंतरराष्ट्रीय पतंग महोत्सवचा शुभारंभ.

बेळगाव:

 

बेळगाव येतील मालिनी ल्टिो येथे आ. अभय पाटील आयोजित अंतरराष्ट्रीय पतंग महोत्सव उद्घाटन बेळगावचे प्रादेशिक आयुक्त महांतेश हिरेमठ ह्यांचा हस्ते झाला.

यावेळी त्यांनी ह्या अंतरराष्ट्रीय पतंग महोत्सवाचे आयोजन उत्तम केल्याचे सांगितले. याठिकाणी उत्सवाचे सणाचे वातावरण निर्माण झाल्याचे वाटत आहे. हा कार्यक्रम यशस्वी व्हावा अश शुभेच्छा त्यांनी ह्यावेळी दिल्या.

आंतरराष्ट्रीय पतंग महोत्स्वाचे आयोजन करणारे आ. अभय पाटील यांनी सर्वन धन्यवाद देत या पतंग महोत्सवात विविध कार्यक्रम अयंजित केलं असल्याचं सांगितले. सर्व बेळगाव वासियांना इतक्या सकाळीच उपस्थित राहून प्रोत्साहन दिल्यामुळे आंतरराष्ट्रीय पतंग महोत्स्व यशस्वी होत असल्याचे सांगितले.

यावेळी सर्व ठिकाणाहून आलेल्या पतंगपटूंनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या.आ. अभ्य पाटील यांनी आंतरराष्ट्रीय पतंग महोत्स्व आयोजित करून सर्वांना प्रोत्साहन देत आहेत. सर्वांनी ह्या पतंग महोत्सवला या आणि विविध रंगाचे, आकाराचे पतंग उडताना पहा आणि आनंद घ्या.

या निमित्ताने  दक्षिण मतदारसंघात दिवाळीमध्ये रांगोळी स्पर्धेच्या विजेत्यांना बक्षिसे आयोजित केलेल्या वितरित करण्यात आली. यामध्ये ५० उत्तेजनार्थ बक्षिसे तसेच दहा जांना सर्वोत्तम रांगोळीची क्षिसे देण्यात अली यामध्ये प्रथम विजेत्या ठरलेल्या रुगीणी धारवाडकर याना आपल्या भावना व्यक्त केल्या.

एकदंर बहुमतीक्षित अशा आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सवाला मालिनी सिटी बेळगाव येथे सुरुवात झाली असून, चार दिवस विविध कार्यकन होणार आहेत. लहान मुलांराठी डान्स, तसेच युथ फेस्टिवल ,बलून फेस्टिवल, फॅशन शो, तसेच विविध कार्यक्रमांची रेलचेल आहे.

बेळगाव दक्षिणचे आ. अभय पाटील हे बेळगावकरांसाठी नेहमीच काही न काही अनोखी उपक्रम राबवत असतात. आता आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सव आयोजित करून बेळगाववासीयांना आगखी एक मनोरंजनाचच खजाना उपलब्ध करून दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Previous post मॉस्कोहून गोव्याकडे येणाऱ्या प्रवासी विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी!
Next post पतंग महोत्सवाला आणि सांस्कृतिक कार्यक्रमला उदंड प्रतिसाद